बारामतीमध्ये झालेल्या या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राने केवळ एक धडाडीचा नेताच गमावला नाही, तर कर्तव्य बजावत असताना एका निष्ठावान पोलीस अधिकाऱ्याचाही अंत झाला आहे. विदीप जाधव हे केवळ एक अंगरक्षक नव्हते, तर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 'सावली' म्हणून ओळखले जात होते.
विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलातील २००९ च्या बॅचचे कर्मचारी होते. गेल्या काही वर्षांपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर (PSO) म्हणूनकार्यरत होते.
शिस्त, सतर्कता आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे पोलीस दलात त्यांचा मोठा सन्मान होता. अजित पवार यांचा कोणताही दौरा असो, विदीप जाधव सावलीसारखे त्यांच्या सोबत असायचे.
विदीप जाधव हे मूळचे ठाण्याजवळील कळवा, विटावा नागरी भागातील रहिवासी होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचे शेजारी त्यांना एक अत्यंत 'मिलनसार' आणि 'नम्र' व्यक्ती म्हणून आठवत आहेत.
परिसरातील मुलांशी त्यांचे असलेले स्नेहाचे संबंध आणि कोणालाही मदत करण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते सर्वांचे लाडके होते. २७ वर्षांपासून त्या परिसरात राहणारे विदीप जाधव हे तिथल्या प्रत्येक कुटुंबाशी भावनिक रित्या जोडलेले होते.
.jpeg)
Post a Comment
0 Comments