Type Here to Get Search Results !

शिरपूरच्या पाचवीतील रुग्वेद जाधवचे ‘ॲनिमल’ पुस्तक प्रकाशित,सर्वत्र कौतुक..

 शिरपूर येथील पाचवीचा विद्यार्थी रुग्वेद धनश्री शशिकांत जाधव याने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी आपल्या लेखणीची चुणूक दाखवत ‘ब्री ब्रुक्स’ (Bree Brooks) या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर ‘ॲनिमल’ नावाचे पुस्तक लिहिले असून त्याचे प्रकाशन ‘ब्री ब्रुक्स’ (Bree Brooks) यांनी केले आहे. त्याच्या या यशाने शिरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याने हिंदी व सामान्य ज्ञान ऑलिम्पियाड (Olympiad) स्पर्धेतही सुवर्ण पदक  यश संपादन केले आहे.


रुग्वेद हा मुकेशभाई आर.पटेल मुला-मुलींची सैनिकी शाळा, तांडे येथील शिक्षक शशिकांत ताराचंद जाधव यांचा मुलगा आहे. लहानपणापासूनच सृजनशील विचारांची जोड लाभलेल्या रुग्वेदने प्राण्यांच्या विश्वावर आधारित हे पुस्तक अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. जागतिक स्तरावरील प्रकाशकाकडे त्याचे पुस्तक प्रसिद्ध होणे, ही तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.

शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील जयश्रीबेन अमरिशभाई पटेल सीबीएससी स्कूलचा विद्यार्थी आहे . शाळेतील उपक्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन, तसेच घरी वडिलांचे लाभलेले शैक्षणिक वातावरण यामुळे त्याला लेखनाची आवड निर्माण झाली. प्राण्यांविषयीची उत्सुकता आणि त्यांच्याबद्दलची माहिती संकलित करून त्याने हे पुस्तक साकारले आहे.

रुग्वेदच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे त्याचे शिक्षक तसेच तांडे सैनिकी शाळेतील शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे. एवढ्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर पुस्तक प्रकाशित करून त्याने इतर विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

Post a Comment

0 Comments