Type Here to Get Search Results !

धामोरी येथील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा गुरुदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.ज्ञानदेव पा.मांजरे यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न.


 श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ,गुरुदत्त ग्रामीण बि.शेती पतसंस्था धामोरी व धामापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी धामोरी यांचे वतीने धामोरी येथील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा गुरुदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.ज्ञानदेव पा.मांजरे यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न.शुक्रवार दि. ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ः३० वाजता श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर धामोरी ता.कोपरगांव येथे अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या कर्जवाटप समितीवर श्री.आनंदराव वाघ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपदी श्री.विलासराव भाकरे व पुजारी सदस्य म्हणुन पत्रकार श्री.निवृत्ती शिंदे यांची निवड झाल्याबद्दल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. मनोजराव जगझाप यांचे उपस्थितीत श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाचे वतिने संस्थापक ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली सोनवणे चेअरमन ह.भ.प.कचरू आण्णा वाणी व्हा.चेअरमन ह.भ.प.भाऊसाहेब नाजगड कार्याध्यक्ष ह.भ.प.राजेंद्र आरगडे उप कार्याध्यक्ष श्री.शरदराव वाणी सचिव ह.भ.प.राजेंद्र बारे खजिनदार श्री.बाळासाहेब वाघ जेष्ठ सदस्य ह.भ.प.बाबासाहेब वाणी यांचे हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी भजनी मंडळाचे मा.चेअरमन हरिभाऊ दरेकर,पोपटराव जेजुरकर,भाऊसाहेब टिळे, संतोष शेठ बागुल,रावसाहेब जगताप धामापुर सोसायटीचे चेअरमन श्री.बाळासाहेब भाकरे गुरुदत्त पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री.दत्तात्रय वाघ धामोरी ग्रां.प.माजी सरपंच भास्करआबा मांजरे पंडितराव जाधव स्वाध्याय परिवाराचे श्री.शरदभाऊ वाघ आदी मान्यवर या सत्कार व सन्मान सोहळ्या प्रसंगी हजर होते कार्यक्रमाचे अध्यक्ष पदासाठी सूचना श्री.बाबासाहेब वाणी तर अनुमोदन श्री.रावसाहेब जगताप यांनी दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील मांजरे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी उपस्थितांच्या वतीने शुभेच्छा देऊन त्यांना आपल्या पदाच्या जबाबदारी साठी व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या शेवटी आभार श्री.रावसाहेब जगताप यांनी मानले.



Post a Comment

0 Comments