आज आरोग्यमंत्री मां ना श्री.प्रकाश आबिटकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे उपजिल्हा रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) येथील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती
या बैठकीदरम्यान पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पिटल) म्हणून उन्नतीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव तसेच साक्री उपजिल्हा रुग्णालय येथे ट्रॉमा सेंटरची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रलंबीत प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच साक्री व पिंपळनेर येथे महिला व बाल रुग्णालय मंजूर करण्याबाबतचे महत्त्वपूर्ण मुद्दे मांडण्यात यावे यासोबतच उपजिल्हा रुग्णालय साक्री येथे आपत्कालीन आरोग्य सेवा प्रभावी करण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका (अॅम्बुलन्स) उपलब्ध करून देण्याबाबतही मागणी करण्यात आली.
या बैठकीस लोकप्रतिनिधी आमदार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (सा.बा.वि.) सचिव उपसंचालक आरोग्य नाशिक तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत साक्री तालुक्यातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Post a Comment
0 Comments