Type Here to Get Search Results !

तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर वतीने नंदुरबार नगरपालिकेत उत्साहात साजरी करण्यात आली......

 तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर वतीने नंदुरबार नगरपालिकेत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांकडून व शहरातील भाजपा शहर पदाधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


या प्रसंगी भाजपाचे नगरपालिका विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, पंकज चौधरी, आनंदा बाबुराव माळी, लक्ष्मण माळी, आकाश चौधरी , दीपक चौधरी,तसेच जयेश चौधरी भाजपा ओबीसी मोर्चा चे अविनाश माळी , अध्यात्मिक आघाडी चे दिनेश पाठक , शहर भाजपा अध्यक्ष नरेश कांकरिया , जिल्हा सचिव संजू साठे , शहर सरचिटणीस प्रशांत चौधरी , शहर सचिव दीपेश धामणे , सतीश जैन , अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष अजहर काजी , शहर महिला अध्यक्ष सरिता चौधरी , छोटू चौधरी  , प्रकाश भोई उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपस्थितांनी शिवरायांच्या पराक्रम व कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments