Type Here to Get Search Results !

आज संसद भवनाच्या मकरद्वाराच्या पायऱ्यांवर नंदुरबार जिल्हाचे खासदार गोवाल पाडवी आणि भंडारा–गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी एकत्र येऊन मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या रोजगार सेवकांच्या वेतनातील अन्याय आणि वाढत्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतींविरोधात जोरदार आंदोलन केले

 आज संसद भवनाच्या मकरद्वाराच्या पायऱ्यांवर नंदुरबार जिल्हाचे खासदार गोवाल पाडवी  आणि भंडारा–गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी एकत्र येऊन मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या रोजगार सेवकांच्या वेतनातील अन्याय आणि वाढत्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतींविरोधात जोरदार आंदोलन केले.


देशभरातील मनरेगा (MGNREGA) अंतर्गत काम करणारे रोजगार सेवक ग्रामीण विकास आणि रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीचा महत्त्वाचा आधार आहेत. तरीदेखील अनेक राज्यांमध्ये त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही, तसेच वेतनामध्ये प्रचंड असमानता आहे.

काही ठिकाणी अत्यल्प मानधन तर काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने देयके दिली जातात. त्यामुळे देशभरातील रोजगार सेवकांसाठी एकसमान व न्याय्य वेतन व्यवस्था लागू करण्याची आमची ठाम मागणी आहे. तसेच थकीत मानधन तात्काळ देण्याचीही मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली.

याचबरोबर आम्ही एलपीजी सिलिंडरच्या प्रचंड वाढलेल्या किंमतींचा मुद्दा देखील संसदेसमोर मांडला.

यूपीए सरकारच्या काळात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत साधारणतः ₹400 ते ₹450 दरम्यान होती, परंतु एनडीए सरकारच्या काळात ही किंमत ₹900 ते ₹1100 च्या आसपास पोहोचली आहे.

या प्रचंड दरवाढीमुळे सामान्य नागरिक, गरीब कुटुंबे, शेतकरी आणि महिलांवर मोठा आर्थिक भार पडत आहे.

संसदेच्या पायऱ्यांवरून आम्ही केंद्र सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की —

रोजगार सेवकांना न्याय मिळाला पाहिजे आणि महागाईमुळे त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे.



Post a Comment

0 Comments