Type Here to Get Search Results !

बोराडी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील यांचे पुस्तक प्रकाशित; औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात मोठी कामगिरी...

 किसान विद्या प्रसारक संस्था संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, बोराडी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील यांनी औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत “Pharmaceutical Organic Chemistry” या विषयावरील पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष बी. फार्मसीच्या द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे फार्मसी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.


डॉ. विकास पाटील यांनी संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नावावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये एकूण ४२ संशोधन निबंध प्रकाशित झाले असून त्यापैकी २९ राष्ट्रीय तर १३ आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी ५ पुस्तके प्रकाशित केली असून त्यांच्या संशोधन लेखांना ७५१ संशोधन लेखांमध्ये उद्धृत (Citation) करण्यात आले आहे.

त्यांचा संचयी इम्पॅक्ट फॅक्टर (IF) 10, एच-इंडेक्स 19 आणि I-10 इंडेक्स 29 इतका असून संशोधन क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. तसेच त्यांच्या नावावर ४ भारतीय पेटंट आणि १ यूके डिझाईन ग्रँटेड पेटंट देखील आहे.

डॉ. पाटील हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे संशोधन कार्यासाठी ३० पी.जी. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक तसेच ४ पीएच.डी. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय ते क.ब.चौ. उ.म.वि., जळगाव येथे फार्मास्युटिकल केमिस्ट्री विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणूनही काम पाहत आहेत.

सध्या ते Science Alert International Journals या पाच आंतरराष्ट्रीय जर्नल्सचे तांत्रिक संपादक म्हणून कार्यरत असून Red Flower Publication, नवी दिल्ली कडून प्रकाशित होणाऱ्या JPMC या राष्ट्रीय जर्नलच्या राष्ट्रीय सल्लागार संपादकीय मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अनेक संशोधन लेखांचे पुनरावलोकन केले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ४० संशोधन पत्रे सादर केली आहेत.

त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या यशाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहित रंधे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार एस. वाघ, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments