सदर बैठकीत मालमत्ता कर, गाळाभाडे व पाणीपट्टीची आकारणी, व्याज, दंड तसेच थकबाकी वसुली संदर्भात नागरिकांमध्ये असलेल्या शंकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
व अभय योजने अंतर्गत 19 मे 2025 पर्यंतच्या थकीत करातील दंडात्मक व्याजाची रक्कम माफ होण्यासाठी शासन दरबारी मागणी करणार आहेच तरी नागरिकांनी थकित असलेली मुद्दल रक्कम मार्च अखेर भरून घ्यावी असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने केले.
या बैठकीस माझ्यासह मा.सौ.रेश्माताई अडगळे (नगराध्यक्षा), नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील, सर्व नगरसेवक तसेच मा. श्री. सचिन पाटील (मुख्याधिकारी, अकलूज नगरपरिषद), अकलूज नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कर, गाळाभाडे व पाणीपट्टी थकीत असलेले अनेक मालमत्ताधारक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments