Type Here to Get Search Results !

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट : तापी–बुराई व नंदुरबारमधील सिंचन प्रकल्पांबाबत चर्चा..

 नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून गोवाल पाडवी यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन तापी–बुराई सिंचन प्रकल्पासंदर्भात पत्राद्वारे व प्रत्यक्ष चर्चेद्वारे मुद्दे मांडले.


महाराष्ट्र शासनाचा तापी–बुराई प्रकल्प हा नंदुरबार जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सुरुवातीला सुमारे ₹70 कोटी खर्चाचा अंदाज असलेला हा प्रकल्प आज ₹800 कोटींपर्यंत गेला आहे. वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत राज्य सरकारकडून दरवर्षी अत्यल्प निधी उपलब्ध होत असल्याने प्रकल्पाची गती मंदावली असून तो अद्याप अपूर्ण आहे.*

या प्रकल्पाचा लाभ शहादा, नंदुरबार, साक्री तालुक्यांसह माझ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अनेक भागांना होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हजारो शेतकऱ्यांना खात्रीशीर सिंचन उपलब्ध होऊन शेती उत्पादनात वाढ होईल, पावसावरची अवलंबनता कमी होईल आणि आदिवासी व दुर्गम भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

सिंचनाबरोबरच प्रकल्पातील वीज निर्मिती घटक पूर्ण होणेही तितकेच आवश्यक आहे. या भेटीदरम्यान तापी–बुराई प्रकल्पासोबतच जलशक्ती मंत्रालयाशी संबंधित इतर विषय, विशेषतः अक्कलपाडा प्रकल्प तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील केंद्र सरकारच्या अन्य सिंचन योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

याच बैठकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील जल जीवन मिशनबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्याचा काही भाग तसेच संपूर्ण नंदुरबार जिल्हा समाविष्ट असून, या भागातील ग्रामीण व आदिवासी पाड्यांमध्ये घराघरांत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचवण्याच्या जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीबाबत प्रगती, अडचणी व आवश्यक उपाययोजनांवर मी मुद्दे मांडले.

अधिकाऱ्यांकडून असे कळविण्यात आले की, हा विषय राज्याच्या अखत्यारित येत असल्याने राज्य सरकारकडून अधिकृत प्रस्ताव केंद्र सरकारकडे आल्यास आवश्यक सहकार्य व निधीबाबत पुढील कार्यवाही शक्य होईल.

*➡️ त्यामुळे तापी–बुराई प्रकल्पासह इतर सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी राज्य व केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरू राहील,*

*➡️ आणि नंदुरबारच्या शेतकरी व आदिवासी भागांच्या पाणी गरजांसाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.*



Post a Comment

0 Comments