Type Here to Get Search Results !

कै.आप्पासाहेब सुकदेव सोमजी माळी यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन...

 आज सोमवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी गांधीं ॲण्ड फुले विद्यालय, कै. उद्यानपंडित बापूसाहेब ग. द. माळी (गुरुजी) कनिष्ठ महाविद्यालय, कस्तुरबा गांधी प्राथमिक विद्यामंदिर आणि द्वारकाई इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने खेडे विद्या प्रसारक मंडळ, खेडे. ता. जि. धुळे या संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी कै. आप्पासाहेब सुकदेव सोमजी माळी यांच्या चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.


या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. सुनील आव्हाड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सौ. एस. टी. अहिरे, संस्थेचे सचिव श्री. दादासाहेब टी. एस. अहिरे, उपाध्यक्ष श्री. नानासाहेब एल. एस. अहिरे, कार्याध्यक्ष श्री. अण्णासाहेब एस. एस. अहिरे, संचालिका सौ.  पी. एल. अहिरे, श्रीमती आर.डी. महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती आर. के. महाजन,  रामी येथील माध्यमिक शाखेचे मुख्याध्यापक श्री. के. एस. माळी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. पी. गवळी, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. धनराज नारायण घरटे, श्री लोटन घना पवार, श्री. हर्षल गवते, श्री. निलेश भदाणे हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कै. आप्पासाहेब यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून तसेच महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच कै. आप्पासाहेब सुकदेव सोमजी माळी यांच्या जीवनाविषयी आपले भाषण केले. संस्थेचे सचिव श्री. दादासाहेब टी. एस.अहिरे सर यांनी कार्यक्रमाविषयी मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुनील आव्हाड यांनी आपल्या भाषणातून कै. आप्पासाहेबांच्या प्रतिमेला उजाळा दिला. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संस्थेच्या सर्व शाखांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन आपले कला गुण सादर केले.

या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून गावातील नागरिक, पालक तसेच विशेष करून महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला संस्थेच्या रामी येथील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व शाखेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  शिस्तबद्ध  नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Post a Comment

0 Comments