Type Here to Get Search Results !

प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय व गुणवत्ताविषयक कामाची आढावा बैठक संपन्न मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी उद्दिष्टपूर्तीसाठी कालमर्यादाबद्ध कार्यवाहीचे दिले निर्देश

दि. 06 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वा. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कामकाजाचा तसेच गुणवत्ताविषयक विविध उपक्रमांचा सखोल आढावा घेण्यासाठी याहामोगी सभागृह, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


या बैठकीत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम, गुणवत्ता विषयक सुरु असलेले उपक्रम, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येणारे उपक्रम, इमारत विरहीत शाळा व वर्गखोली बांधकामांची प्रगती, आदर्श शाळा बांधकाम, यु-डायस प्रणालीवर नोंदविण्यात आलेली स्वच्छतागृहांची (मुले/मुली) सद्यस्थिती व वापर, धोकेदायक व जीर्ण इमारती व वर्गखोल्यांचे निर्लेखन, यु-डायस प्रणालीवरील अपार आयडी नोंदणी, विनोबा ॲपवरील शिक्षक नोंदणी, शालेय पोषण आहार अंतर्गत परसबाग निर्मिती, समग्र शिक्षा अंतर्गत अनुदान व खर्चाची सद्यस्थिती, प्रलंबित लेखा आक्षेप, अखर्चीत निधी समर्पित करणे, निधी खर्च, निवृत्ती वेतनाची सद्यस्थिती, प्रलंबित वैद्यकीय देयके, चटोपध्याय/निवड श्रेणी प्रस्ताव, रिक्त व अतिरिक्त शिक्षक, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे कामकाज तसेच Digital Innovation Initiative यासह इतर अनुषंगिक विषयांवर सविस्तर आढावा घेऊन विहीत कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले.

या आढावा बैठकीस  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबारचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भानुदास रोकडे, उपशिक्षणाधिकारी वंदना वळवी, निलेश लोहकरे, डॉ. युनुस पठाण, उप शिक्षणाधिकारी (योजना), कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा अभियान यांच्यासह सर्व गटांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, संबंधित अधिकारी-कर्मचारी, समग्र शिक्षण विभागातील बांधकाम  अभियंते, डेटा एंट्री ऑपरेटर तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता वृद्धिंगत करणे, प्रशासकीय कार्यपद्धती अधिक सक्षम करणे तसेच अपूर्ण व प्रलंबित कामांचा निपटारा करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


Post a Comment

0 Comments