Type Here to Get Search Results !

तळोदा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्यक साधने मोफत उपलब्ध करून देण्यासाठी भव्य शिबिराचे आयोजन....

 तळोदा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्यक साधने मोफत उपलब्ध करून देण्यासाठी भव्य तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलीमको) यांच्या सहकार्याने आणि शहादा–तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष पुढाकारातून हे शिबिर १७ फेब्रुवारी २०२६ रोजी तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात भव्य प्रमाणावर पार पडले.


या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. शेकडो नागरिकांनी विविध सहाय्यक साधनांची तपासणी करून नोंदणी पूर्ण केली. वयश्री योजनेअंतर्गत घडीचे वॉकर, श्रवणयंत्र, चालण्याची काठी, कमोड खुर्ची, चष्मा, चाकाची घडीची खुर्ची, संपूर्ण पाठीचा पट्टा, मानेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, कंबरेचा पट्टा यांसह अन्य वैद्यकीय सहाय्यक साहित्य मोफत देण्यात येणार असून, यामुळे ज्येष्ठांच्या दैनंदिन जीवनमानात मोठी सुधारणा होणार आहे.

कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये आमदार राजेश पाडवी, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी, गट विकास अधिकारी किर्वे, विलास डामरे, शहराध्यक्ष गौरव वाणी, स्थानिक नेते जितेंद्र सूर्यवंशी, सुभाष चौधरी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, अनुप गौतम जैन, जगदीश परदेशी, उदासी, संदीप परदेशी, जितेंद्र दुबे, सुरज माळी, कपिल कर्णकार, राहुल पाडवी, विवेक पाडवी व गोविंदा पाडवी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे हे शिबिर पूर्णतः यशस्वी ठरले असून नागरिकांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यात अशा सेवा अधिक व्यापक प्रमाणात राबविण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.



Post a Comment

0 Comments