ग्रेट भेट
शहादा येथील विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा तालुका एज्युकेशन संस्थेच्या एस एन डी टी महिला महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या सौ.प्रीतीताई अभिजीत पाटील यांनी आपल्या शहाद्याच भूषण असलेल्या रावेरच्या खासदार तथा केंद्रीय युवक व कल्याण मंत्री मा. रक्षाताई खडसे तसेच चाळीसगावच्या लोकनीयुक्त नागराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. आपल्या तालुक्यातील व परिसरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी करावयाच्या उपायोजना, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, बचत गट यांविषयी चर्चा करुन प्रत्येक घरातील महिला स्वतःचा पायावर भक्कमपणे उभी राहून आर्थिक दृष्ट्या, सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी उपक्रम राबवण्या बाबत प्रदीर्घ चर्चा केली. ह्या संबंधी कुठल्याही प्रकारच्या उपक्रमास निश्चितच आवश्यक ते सर्व सहकार्य करु असे आश्वासन दोनीही नेत्यांनी दिले.

Post a Comment
0 Comments