देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक ३० जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार पनवेल महानगरपालिका मुख्यालयात आज शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी, २०२६ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस 'हुतात्मा दिन' म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, उपायुक्त रवीकिरण घोडके, उपायुक्त स्वरूप खारगे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, उप अभियंता विलास चव्हाण, लेखाधिकारी संग्राम ऱ्होरकाटे, उप मुख्य लेखा परीक्षक संदिप खुरपे, पशुवैद्यकीय अधिकारी भगवान गीते, उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments