Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांना मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित शोकसभेत भावूक वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.

 आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांना मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित शोकसभेत भावूक वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांकडून मौन पाळून मा. अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.


या दुःखद प्रसंगी, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. इकबालसिंह चहल, मनीषा म्हैसकर, अश्विनी भिडे, असिम कुमार गुप्ता, विकासचंद्र रस्तोगी, वेणुगोपाल रेड्डी, अनुपकुमार सिंग, राधिका रस्तोगी, एकनाथ डवले, सौरभ विजय, डॉ. हर्षदीप कांबळे, अतुल पाटणे, संजय खंदारे, एस. चोक्कलिंगम, रणजितसिंह देओल, वीरेंद्र सिंह, गणेश पाटील, संतोष कुमार, दिलीप घुमरे, जयश्री भोज, अंशु सिन्हा, राजेश गवांदे, विजय वाघमारे, मकरंद देशमुख यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मा. अजितदादांस आदरांजली वाहिली. तसेच पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी परिवार व महाराष्ट्राच्या तमाम जनतेप्रती सहसंवेदना व्यक्त करत, हे दु:ख सहन करण्याचे बळ लाभावे, अशी प्रार्थना केली.

Post a Comment

0 Comments