Type Here to Get Search Results !

वैभव विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

वैजाली प्रतिनिधी - पंकज पाटील

 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित वैभव विद्यालय वैजाली येथे दिनांक27 जानेवारी 2026 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षपद श्रीराम पोपट पाटील ह्यांनी स्विकारले .कार्यक्रमाची सुरुवात गावातील ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच यांच्या हस्ते दीपप्रजवलनाने करून करण्यात आली. या कार्यक्रमास विद्यालयाच्या शिक्षकांनी मुलांच्या पालकांना आणि  समस्त गावकऱ्यांना आमंत्रण पत्रिका लेखी स्वरुपात घरोघरी दिल्या मुळे विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या सांस्कृतिक  कार्यक्रमात विविध देशभक्तीपर गीत ,आदिवासी गीत, महाराष्ट्रातील प्रख्यात नाट्य गीत लावणी तसेच विविध प्रकारचे नृत्य आणि नाटिका सादर करण्यात आल्या . विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावी व त्याच्यात भाषण कला अवगत व्हावी ह्या उद्देशाने विद्यालयातील शिक्षकांनी बहुतांश विद्यार्थींना ह्या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले आणि तशी तयारी देखील करून घेतली.


विद्यार्थ्यांनी खूप सुंदर रित्या केलेल्या सादरिकरणंमागे शिक्षकाचे अमाप कष्ट दिसत होते.या सर्व कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षिका तसेच विद्यालयातील सर्व कर्मचारी वर्गांनी आठ दिवसापासून विद्यार्थ्याकडून पूर्वतयारी करून घेतली आणि हा कार्यक्रम खूप सुंदर रित्या सादर करून घेतला. या कार्यक्रमात वैजली ग्रामस्थ नांदेड ग्रामस्थ आणि परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली आणि विद्यार्थ्यांच्या या कला कौशल्याला आशीर्वाद रुपी बक्षिसे दिली तसेच या क्रमांकाला गावातील सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ज्येष्ठ नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे समस्त  कर्मचारी वर्गाने खूप मेहनत घेत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाला श्री पंकज पाटील ,जगन्नाथ चित्ते, अनिता पवार, रवींद्र वळवी ,विलास ठाकरे , शिवाजी पाटील, काशिनाथ पाटील ,विनोद पाटील आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहीली.शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक सुदाम माळी ह्याच्या मार्गदर्शना खाली सांस्कृतीक मंडळाने केलेल्या आयोजनाचे सर्व स्तरावरून विशेष कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments