बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे' आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातीच्या एक हजाराहून अधिक पशू प्रदर्शन होणार असून प्रदर्शनाची तयारी वेगात सुरू आहे.
या प्रदर्शनात पशुपालकांना गायी, म्हशी, घोडे, शेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळतील. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालन, आहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

Post a Comment
0 Comments