शहादा प्रतिनिधी - मनिष सोनवणे
शहादा नगरपरिषदेच्या नगरसेविका म्हणून निवड झाल्याबद्दल मा. ममताताई पवार यांना महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूर–अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिनंदनपर पत्र पाठवून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी मिळवलेला दैदीप्यमान विजय हा केवळ वैयक्तिक यश नसून, तो जनतेच्या विश्वासाचा कौल असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी या पत्रात नमूद केले आहे.
मंत्री बावनकुळे यांनी पत्रात म्हटले आहे की, ममताताई पवार यांनी मिळवलेला विजय हा समाजसेवेसाठी नवी ऊर्जा देणारा असून, या विजयातून समाजाचे ऋण फेडण्याची संधी त्यांना मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेने दाखवलेला विश्वास, प्रेम आणि अपेक्षा ही त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याची खरी पावती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नगरसेविका म्हणून कार्य करताना पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि निष्ठेने लोकहिताचे काम करून जनतेचा विश्वास अधिक दृढ कराल, असा ठाम विश्वास मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि लोककल्याणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्या सक्रिय भूमिका निभावतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत असून, या प्रवासात सौ ममताताई पवार यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा उल्लेखही मंत्री बावनकुळे यांनी आपल्या पत्रात केला आहे. भाजपच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि पक्षवाढीसाठी त्या सातत्याने प्रयत्न करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
पत्राच्या शेवटी मंत्री बावनकुळे यांनी मा. ममताताई पवार यांच्या उज्ज्वल राजकीय वाटचालीसाठी, यशस्वी कार्यकाळासाठी आणि भावी वाटचालीसाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments